Warning: include_once(/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php): Failed to open stream: Permission denied in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508

Warning: include_once(): Failed opening '/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php84/usr/share/pear:/opt/alt/php84/usr/share/php:/usr/share/pear:/usr/share/php') in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508
मोहिते पाटलांच्या उपनगराध्यक्ष पदाच्या वादामुळे अकलूज नगपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचा फज्जा! – Bandkhor News

LOADING...

 मोहिते पाटलांच्या उपनगराध्यक्ष पदाच्या वादामुळे अकलूज नगपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचा फज्जा!
August 26, 2026

मोहिते पाटलांच्या उपनगराध्यक्ष पदाच्या वादामुळे अकलूज नगपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचा फज्जा!

अकलूज नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेकडे उपनगराध्यक्ष, गटनेते यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी फिरवली पाठ

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांशी चर्चा करून आपल्या गावच्या विकासासाठी निर्णायक भूमिका घ्यावी यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले जाते. मात्र नुकताच नगराध्यक्षा सौ. रेश्मा अडगळे यांनी सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढलेला असतानाही उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, गटनेते व सत्ताधारी नगरसेवकांसह सर्वांनी या सर्वसाधारण सभेकडे पाठ फिरवल्याने अकलूजकरांतून आश्चर्य व्यक्त केले जात असून उपनगराध्यक्ष पदावरून मोहिते पाटील परिवारात सुरू असलेल्या वादामुळेच अकलूज नगरपरिषदेचा फज्जा उडाल्याची चर्चा नगरसेवकांतून होताना दिसत आहे.

मोहिते पाटील समर्थकांनी ‘जाणता राजा’ ही बिरूदावली दिलेले जयसिंह मोहिते पाटील यांचे सूपुत्र संग्रामसिंह मोहिते पाटील हे राजकारणातील कच्चे मडके निघाले. कारण राजकारणात चांगली माणसे यशस्वी होत नाहीत, संग्रामसिंह मोहिते पाटील हे सरळमार्गी, येईल त्याचे काम करणारे नेतृत्व असल्याने व त्यांना राजकीय कुरघोड्या जमत नसल्याने ते राजकारणात सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे जयसिंह मोहिते पाटलांनी त्यांचे नातू सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांना राजकीय धडे द्यायला सुरूवात केली. पण अकलूज ग्रामपंचायत सरपंच पदाचा चांगला दांडगा अनुभव असलेले व सयाजीराजे यांच्यापेक्षा राजकारणात ज्येष्ठ अनुभवी असलेले शिवतेजसिंह मोहिते पाटील हे अकलूज नगरपरिषदेचे पहिले उपनगराध्यक्ष ठरले. पण आता आपल्या नातवाला उपनगराध्यक्षपदाची संधी मिळावी म्हणून जयसिंह मोहिते पाटील हट्टाला पेटल्याने शिवतेजसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांच्यात वाद झाला असून ते गेल्या दोन दिवसांपासून बाहेर निघून गेल्याची खात्रीशीर माहिती विशेष सूत्रांकडून मिळत आहे. वातविक पाहता या सर्वसाधारण सभेतच सयाजीराजे मोहिते पाटील यांना उपनगराध्यक्ष करण्याचा घाट जयसिंह मोहिते पाटलांनी घातला होता, आणि म्हणूनच अकलूज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेचा खेळखंडोबा झाल्याने अकलूजकरांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

अकलूज नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत अकलूज शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी मुन्फ्रा वित्तीय संस्थेकडून मंजूर झालेल्या कर्जासाठी नमूद अटी व शर्थी मान्य करण्यास आणि त्रिपक्षीय करारनामा करण्यास मंजुरी देणे, अकलूज नगरपरिषद हद्दीतील मलनिःसारण कामासाठी एसटीपी पंप हाऊस बांधण्यासाठी जागा खरेदी करणे, घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा डेपोसाठी खाजगी जागा भाडेतत्वावर घेणे, कार्ड रूम क्लबसाठी नाहरकत देणे, कर्मचाऱ्यांचा गट विमा उतरवणे, महाराष्ट्र शासनाच्या एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युडीसीपीआर) मधील विनियम क्रमांक ३.११ मधील तरतुदीनुसार विकास योजना आराखड्यातील मौजे माळेवाडी येथील गट नं. ११ मधील प्रस्तावित १२.०० मी. रूंदीचा विकास योजना रस्ता स्थलांतरित करणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०२६-२०२७ या वर्षाकरिता विविध विकासकामे घेणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत सन २०२६-२०२७ या वर्षाकरिता विविध विकासकामे घेणे, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन २०२६-२०२७ या वर्षाकरिता विविध विकासकामे घेणे, अकलूज नगरपरिषदेकरिता स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यासाठी शहर समन्वयक यांची नियुक्ती करणे, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत कामे निश्चिती करणे, अकलूज नगरपरिषदेमधील विविध विकासकामांसाठी दरपत्रक मागविणे, अकलूज नगरपरिषद हद्दीतील अकलूज नगरपरिषद मालकीच्या जागा मोजणीसाठी मोजणीदार नेमणे आणि अकलूज नगरपरिषद हद्दीतील बेकायदेशीर झेंडे, बोर्ड, कट्टे काढणे या विषयांवर सर्वसाधारण सभेत चर्चा होणार होती. मात्र उपनगराध्यक्ष पदाच्या वादातून अकलूजच्या विकासाच्या या मुद्द्यांवर उपनगराध्यक्ष, सत्ताधारी गटनेते व सत्ताधारी नगरसेवकांच्या गैरहजेरीमुळे चर्चा होऊ शकली नाही. परिणामी यामुळे अकलूजच्या विकासाला खीळ बसल्याने अकलूजकरांतून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यापुढे सत्ताधाऱ्यांनी आपल्या घरातील वाद बाजूला ठेवून अकलूजच्या विकासासाठी तरी अकलूज नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित रहावे. सत्ताधारी नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक या सर्वसाधारण सभेला उपस्थित न राहिल्याने अकलूजसह परिसरातूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जर तुम्हाला अकलूजच्या विकासाचेच काही देणेघेणे नसेल तर खुशाल राजीनामा देऊन रिक्त झालेल्या जागांकरिता फेरनिवडणूक घ्यावी असा संतप्त सवाल अकलूजकरांतून उपस्थित केला जात आहे.

Prev Post

सचिन जगन्नाथ देशमुख याचेकडून मातंग…

Next Post

पुणे पोलिस भरतीत 19 बोगस…

post-bars

Leave a Comment