Back To Top

सचिन जगन्नाथ देशमुख याचेकडून मातंग महिलेची गोळी झाडून हत्या

ॲट्रॉसिटी ॲक्टसह खूनाचा गुन्हा दाखल करावा अशी दलित समाजातून मागणी

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): पैशांच्या गुर्मीत वावरून दलितांना तुच्छ समजणाऱ्या सचिन जगन्नाथ देशमुख या जातीयवादी भडव्याने मातंग समाजातील उषा विजय साठे या महिलेवर गोळीबार करून तिची निर्घृण हत्या केल्याने अकलूजसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सचिन देशमुख याचेवर ॲट्रॉसिटी ॲक्टसह खूनाचा गुन्हा दाखल करावा अशी दलित समाजातून मागणी होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चौंडेश्वरवाडी येथे राहणारे जगन्नाथ देशमुख यांच्या शेतात विजय साठे व त्यांची पत्नी उषा साठे हे मोलमजुरी करीत होते. यादरम्यान उषा साठे ही रस्त्यावर थांबलेली असताना सचिन जगन्नाथ देशमुख याने तिच्या डोक्यात गोळी झाडली. तेव्हा गोळीचा आणि आपली पत्नी ओरडल्याचा आवाज ऐकून विजय साठे शेतातून बाहेर पळत आले, तेव्हा त्यांनी आपली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर रिव्हॉल्वर सचिन जगन्नाथ देशमुख यांच्या हातात होता हे पाहिले. या घटनेनंतर उषा साठे यांना अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही बाब अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी धाव घेतली. सचिन देशमुख यांनी काही वर्षांपूर्वी एका मातंग महिलेचा हात धरला होता, तेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी समाजबांधव आक्रमक झाले होते. मात्र त्यावेळी 3 लाख रुपये देतो पण विषय मिटवा असे तो कार्यकर्त्यांना म्हणाल्यानंतर कार्यकर्ते प्रचंड चिडले होते. सचिन जगन्नाथ देशमुख याच्या या प्रवृत्तीवरूनच तो पैशाचा माज दाखवून दलित समाजाबद्दल किती नीच मानसिकता बाळगतोय हे समजते. पैशांनी हा भडवा कितीही मोठा असला तरी दलित समाज स्वाभिमानी आणि आक्रमक समाज आहे. तो पैशाच्या बळावर दलित समाजाला चिरडण्याचा प्रयत्न करीत असला तरी त्याचा माज उतरविण्यासाठी हा समाज सक्षम आहे. सचिन जगन्नाथ देशमुख हा गोळी चुकून लागलीय असे म्हणून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र जर चुकून गोळी लागली असती तर ती एका रेषेत हात व डोक्यातून आरपार गेली असती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या घटनेचा कसून तपास करून जातीयवादी प्रवृत्तीच्या सचिन जगन्नाथ देशमुख याचेवर ॲट्रॉसिटी ॲक्टसह खूनाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा सर्व दलित समाजाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेतला जाईल अशा संतप्त प्रतिक्रिया दलित समाजातून उमटत आहेत.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Prev Post

मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्या धवलसिंह मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल करा!

post-bars

Leave a Comment