हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा ७ जुलै रोजी अकलूज येथे भव्य कीर्तन सोहळा
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): लोकनेते कै. प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे वतीने समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या भव्य हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कीर्तन सोहळा विजय चौक अकलूज येथे सोमवार दिनांक ७/७/२०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १०.०० वाजेदरम्यान होणार आहे. मागील ९ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे वतीने समाज प्रबोधनकार हभप श्री. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हरीकिर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आहे. याचबरोबर जनसेवा संघटना व सोलापूर जिल्हा तालीम संघाचे वतीने महाराष्ट्र केसरी पै. वेताळ शेळके यांचा एक लाख रुपयांची देणगी व सन्मानचिन्ह, तसेच त्यांच्या आई वडिलांचा संपूर्ण कपड्यांचा आहेर देऊन सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शाहीर राजेंद्र कांबळे यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार मिळाल्याबद्दल सहकुटुंब सहपरिवार सत्कार करण्यात येणार आहे.
हभप श्री. अशोक शिंदे महाराज गुरसाळेकर यांचा सोनी टीव्ही मराठीवरील आयोजित केलेल्या “कोण होणार महाराष्ट्राचा लाडका किर्तनकार” स्पर्धेत उपविजेते झाल्याबद्दल सहकुटुंब सहपरिवार सत्कार करण्यात येणार आहे. यासह विविध संस्थेच्या वतीने लोकनेते कै. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुण्यतिथीनिमित्त अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले आहेत. तरी सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून या हरिकीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे.