धैर्यशील मोहिते पाटलांना शिवीगाळ करुन घरावर हल्ला करायला लावणाऱ्या उत्तम जानकरांच्या विरोधात मोहिते पाटील समर्थकांतून तीव्र संताप
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): एससी समाजासाठी राखीव असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून बोगस जातीच्या दाखल्याआधारे विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या जातचोर उत्तम जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांना शिवीगाळ करून घरावर हल्ला करण्याबरोबरच त्याचा पाय मोडावा लागतोय असे वक्तव्य केल्याने जानकरांच्या विरोधात मोहिते पाटील विरोधकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शिवरत्नने धैर्यशील मोहिते पाटलांना खासदार करण्यासाठी उत्तम जानकर यांच्याबरोबर समझोता करुन युती केली होती. तेव्हा बहुतांश मोहिते पाटील समर्थकांना ही अनैसर्गिक युती मान्य नव्हती. परंतु मोहिते पाटलांसमोर बोलणार कोण? लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवत असताना मोहिते पाटील व जानकर एकमेकांची गळाभेट घेतात काय, सत्कार करतात काय, एकमेकांच्या बंगल्यावर जातात काय! पण नुकत्याच व्हायरल झालेल्या क्लीपमुळे उत्तम जानकरांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे दिसून आले. राजकारण हे तत्वाचे असावे, एखाद्याच्या घरावर किंवा त्या व्यक्तीवर हल्ला करण्याची भाषा करून जर कुणी विरोधकांना खालच्या पातळीवर शिवीगाळ करीत असेल तर त्याची राजकारण करायची लायकीच नाही. आणि जो हे ऐकून सुध्दा त्याचीच ढोलकी वाजवत असेल तर त्याच्यासारखा हतबल कुणी नसेल. उपद्रवी व्यक्ती समाजाची ढाल करुन खालच्या पातळीवर बोलत असेल तर समाजाने सुध्दा याबद्दल त्याला बोलायलाच हवे. ॲड. एस. बी. पाटील यांनी आजपर्यंत केवळ तत्त्वांचे राजकारण केले. पण समाजाने गुंड प्रवृत्तीच्या उत्तम जानकरांनाच डोक्यावर घेतले. तहसीलदारांना मारहाण केल्यानंतर चर्चेत आलेल्या उत्तम जानकरांनी मोहिते पाटलांना भीती दाखवून आजपर्यंत तडजोडीचेच राजकारण केले. मोहिते पाटलांना शिव्या देऊन मोठं झालेलं नेतृत्व असे उत्तम जानकरांना म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मोहित्या शिवाय ते कधीच बोलले नाहीत. इथपर्यंत ठीक आहे, पण धैर्यशील मोहिते पाटलांना आईवरून केलेली शिवीगाळ, घरावर हल्ला करुन धैर्यशील मोहिते पाटलांचा पाय मोडण्याइतपत बोललेले उत्तम जानकर अनेकांच्या डोक्यात गेलेत. ऐकणाऱ्यांचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. उत्तम जानकरांच्या मोहिते पाटलांबद्दल केलेल्या गलिच्छ भाषेमुळे मोहिते पाटील समर्थकांसह सर्वसामान्य जनताही कमालीची संतापली आहे. असले गुंड आमदार करण्यापेक्षा मोहिते पाटलांच्या शिव्या खाऊ अशा संतप्त प्रतिक्रिया माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक व सर्वसामान्य जनतेतून निघत आहेत.