जातचोराला रोखायचे असेल तर स्वाभिमानी एससी समाजाने मतविभाजन न करता रामभाऊ सातपुते यांनाच साथ द्यावी !
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): सध्या मोहिते पाटलांबरोबर अनैसर्गिक युतीत असलेले उत्तम जानकर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून बोगस धनगर खाटिक या जातीच्या दाखल्याआधारे एससी समाजाच्या हक्काच्या जागेवरून आमदारकीची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे एससी समाजावर हे खूप मोठे गंडांतर असल्याने एससी समाजावरील अतिक्रमण थांबवायचे असेल तर स्वाभिमानी एससी समाजाने इतर उमेदवारांमध्ये मतविभाजन न करता कर्तृत्ववान व आरोग्यदूत आमदार रामभाऊ सातपुते यांनाच एकगठ्ठा मतदान करावे असा सूर एससी समाजातील बुद्धिजीवी वर्गातून निघत आहे.
‘अतिशहाणा त्याचा बैल रिकामा’ अशी गत परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या काहीजणांची झालेली आहे. राजकीय स्वार्थापोटी आम्ही किती कट्टर परिवर्तनवादी आहे हे दाखविण्यासाठी काहीजण भाजपा, आरएसएसच्या विरोधात बोलताना दिसतात. मात्र त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात हे अनेकदा सामान्य जनतेने पाहिलेले आहे. जातचोर उत्तम जानकरांचे समर्थन करणारे काही दिवटे आमदार रामभाऊ सातपुते यांच्यावर आंबेडकरी चळवळीच्या विरोधात असल्याचे, ते भाजपा-आरएसएसचे असल्याचे बोलताना दिसतात. पण जातचोर तुमची …..तोय याचेही भान या दिवट्यांना नाही. जातचोर उत्तम जानकर ज्यांनी जीवनात उभे केले त्यांचे होऊ शकले नाहीत, तर तुमचे काय होणार आहेत? आमदार रामभाऊ सातपुते यांच्यावर हे बेंबीच्या देठापासून बोलतील, पण आपल्या एससी समाजात घुसखोरी करून उत्तम जानकर राजकीय आरक्षणाबरोबरच शैक्षणिक, नोकरी आदी आरक्षणातही घुसखोरी करून आपल्या भावी पिढीला वंचित ठेवणार आहेत याबद्दल यांच्या तोंडातून एकही अवाक्षर निघणार नाही. कारण यांची वळवळच आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी सुरू आहे. वास्तविक पाहता आमदार रामभाऊ सातपुते हा काही नवीन चेहरा नाही. गेल्या पाच वर्षांत आमदार रामभाऊ सातपुते यांनी केलेली विकासकामे तोंडात बोटं घालायला लावणारी आहेत. कामं करून घेण्यासाठी त्यांच्याकडे वशिला लागत नाही. कुठलाही सामान्य माणूस त्यांच्याकडे काम घेऊन गेला की तात्काळ फोनवरून संबंधित व्यक्तीचे काम मार्गी लावतात. इतकेच नव्हे तर ज्यांनी विरोधात काम केले आहे हे माहिती असूनही आमदार रामभाऊ सातपुते यांनी त्यांची कामे मार्गी लावली आहेत. आरोग्यदूत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख निर्माण झाली आहे. कारण आपल्या मतदारसंघातीलच नव्हे तर बाहेरील अनेक रुग्णांना त्यांनी जीवदान मिळवून दिले आहे. एकीकडे उत्तम जानकर व आमदार रामभाऊ सातपुते यांच्या कामांचे मूल्यमापन केले तर उत्तम जानकर केवळ संधीसाधू, आपमतलबी, एससी समाजात घुसखोरी करणारे, ज्यांनी मोठे केले त्यांनाच कोलणारे आहेत, तर आमदार रामभाऊ सातपुते हे विकासाभिमुख नेतृत्व, तळागाळातील लोकांची कामे करणारे, कसलाही दुजाभाव न करणारे, आरोग्यदूत, पक्षनिष्ठेसह जनतेशी एकनिष्ठ राहणारे आहेत. ते डबल ढोलकी अजिबात नाहीत. आर या पारची भूमिका घेऊन आपल्या भूमिकेवर ठाम राहणारे आहेत. मग उगीचच अपक्षांनी आपली खोगीरभरती करुन मतविभाजन का करावे? दरम्यान दोघांना नावं ठेवून त्यांच्या विरोधात लढून निवडून येण्याचं स्वप्न पहाणे म्हणजे आभाळाला ठिगळ लावण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे राजकारणात माननीय कांशीराम यांचा फॉर्म्युला वापरून ‘ए’ चा माज जिरवायचा असेल तर ‘सी’ ने ‘बी’ ला साथ द्यावी, याप्रमाणे जातचोर उत्तम जानकरांना रोखायचे असेल तर स्वाभिमानी एससी समाजाने मतविभाजन न करता सर्वांनी जनहिताची जाण असणाऱ्या आमदार रामभाऊ सातपुते यांनाच पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी प्रयत्न करावा असे परिवर्तनवादी चळवळीतील बुद्धिजीवी वर्गातून बोलले जात आहे.