खुनशी धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाल्याने लढाऊ कार्यकर्ते असुरक्षित!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना सुखी समाधानी ठेवणे हे लोकप्रतिनिधीचे काम असते. मात्र खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अनेक लोकांची फसवणूक करण्याबरोबरच त्यांना धमकावल्याचेही गुन्हे त्यांच्यावर पोलिस स्टेशनला दाखल झाले आहेत. विजय शुगर व विजय नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून धैर्यशील यांनी अनेकांना देशोधडीला लावले आहे. तसेच त्यांनी काही खून केल्याचे विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. असे हे गुंड प्रवृत्तीचे खुनशी धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाल्यामुळे माळशिरस तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील लढाऊ कार्यकर्ते असुरक्षित आहेत असा सूर लढवय्या कार्यकर्त्यांतून निघत आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी संयमी राजकीय नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली. विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे राज्य पातळीवरचे, तर जयसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील हे तालुका पातळीवरचे राजकारण करणारे नेते आहेत. जयसिंह व धैर्यशील हे दोघेही अत्यंत खुनशी, पण धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अवतीभवती गावगुंडांच्या टोळक्यांचा गराडा असतो. असे हे नेहमी गावगुंडांच्या सान्निध्यात असलेले धैर्यशील मोहिते पाटील आता खासदार झाले आहेत. त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून स्वाभिमानी जनतेला चिरडायला ते आता मोकळे झाले आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण हाती सत्ता नसतानाही त्यांनी अनेकांचा कार्यक्रम केला आहे. विजय नागरी पतसंस्था व विजय शुगरला ऊस घातलेल्या अनेक शेतकऱ्यांची बिले अदा केली नाहीत. काहीजणांना जेलमध्ये सडवून त्यांच्या सुखी संसाराची राखरांगोळी केली आहे. मात्र आता ते खासदार झाल्यामुळे आपल्या सत्तेचा अंदाधुंदी वापर करण्याची शक्यता आहे. म्हणून तर त्यांच्यासोबत फिरणाऱ्या काहीजणांना धैर्यशील मोहिते पाटील खासदार होऊच नयेत असे मनापासून वाटत होते. पण तुतारीच्या हवेत त्यांचे स्टार चमकले व ते निवडून आले. दलित चळवळीचा बुरखा पांघरणारे काहीजण अकलूज परिसरातील लढवय्या कार्यकर्त्यांच्या खबरी देण्याचे काम इमानेइतबारे करतात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार मोहिते पाटलांच्या अन्याय अत्याचाराविरोधात व हिटलरशाहीच्या विरोधात लढणारे कार्यकर्ते न डगमगणारे आहेत. धैर्यशील यांनी आपल्यासोबत असणाऱ्या काही गावगुंडांच्या संपर्कातील गावगुंडांना आपल्या विरोधकांवर सोडल्याची कुणकुण लागली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीही घडू शकते. पण कसल्याही संकटांना घाबरून शेपूट घालून बसणारे इतकेही पळपुटे विरोधक नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार आम्हा विरोधकांचा लढा सुरूच राहणार आहे. विरोधकांमध्ये काही भीमसैनिकही आहेत. ते तर कुणालाच भीक घालत नाहीत. घाबरायचेच असते तर आम्ही मैदानात उतरलोच नसतो. डोक्याला कफन बांधूनच आम्ही मोहिते पाटील विरोधक मैदानात उतरलो आहे. पण तरीही एखादे कांड झालेच तर त्याला खासदार धैर्यशील मोहिते पाटील हेच जबाबदार असतील. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापासून जीवितास धोका असल्याचे निवेदन दिले आहे. त्यामुळे सदर विषयासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालय व गृहमंत्री कार्यालयातून अकलूज पोलिस स्टेशनशी पत्रव्यवहार झाला आहे. पण खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा जबाब झालाय की नाही हे गुलदस्त्यातच आहे. दरम्यान आम्हावर कुणी हल्ला करण्याचा प्रयत्न केलाच तर आम्ही भीमसैनिक सर्वांस पुरुन उरू! आमचा ग्रुपच लेखणी, फायटिंग व सर्व व्यवस्था बघणारा आहे. मात्र गुंड प्रवृत्तीचे धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाल्यामुळे अकलूजसह माळशिरस तालुक्यातील लढवय्ये कार्यकर्ते असुरक्षित आहेत हे मात्र दिसून येत आहे.