गाफीलपणाचा फटका धैर्यशील यांना बसणार?
माढा (बंडखोर वृत्तसेवा): चांगल्या सल्लागारांअभावी राजकारणात राजकारण्यांचा आलेख घसरतो, तर हुल्लडबाज आणि आततायी वृत्तीच्या कार्यकर्त्यांमुळे राजकारणी हा कधीच आत्मपरीक्षण करीत नाही. तीच अवस्था धैर्यशील मोहिते पाटलांची झाली आहे. मतदारसंघात आपले सांभाळलेले कार्यकर्ते पाठवून मतांचा जोगवा जनतेकडून मिळत नाही, तर सकारात्मक मनांचे रूपांतर हे मतात होत असते हे शिवरत्नला समजलेच नाही. यशस्वी राजकारणी हा आपली बलस्थाने शोधतो, दुर्बल स्थाने शोधतो आणि दुर्बल स्थानांकडे अधिक लक्ष केंद्रित करतो. माळशिरस तालुका हे शिवरत्नचे बलस्थान आहे हे जगजाहीर असताना सुध्दा स्वयंघोषित जाणते राजे जयसिंह मोहिते पाटलांनी माळशिरस तालुका सोडला नाही. माळशिरस तालुक्यात अंदाजे ११५ गावे आहेत. बाकी ७८५
गावांचं काय? त्याठिकाणी शिवरत्न गाफील राहिला, त्याचा फटका निश्चितच धैर्यशील मोहिते पाटील यांना बसणार असल्याचे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.
विजयदादांचे राजकारण हे संयमी राजकारण होते. धैर्यशील यांचे राजकारण उथळ पाण्याला खळखळाट फार असे आहे. समाजाच्या नावाने दुकानदारी मांडणाऱ्या उत्तम जानकरांना मतांच्या जोगव्यासाठी जवळ केल्याचे तालुक्यातील विरोधकांना आवडले नाही. तसेच सत्ताधाऱ्यांना सुध्दा रूचले नाही. हे येणाऱ्या ४ जूनला शिवरत्नला मतांच्या रिपोर्ट वरून समजेल. पवारांच्या आशिर्वादाचे हात डोक्यावर येण्यासाठी उत्तम जानकरांनी प्रचारासाठी आपला अधिक वेळ खा. सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात दिला आहे. त्यामुळे बारामतीच्या दरबारात जानकरांचे महत्त्व आज वाढले आहे. म्हणूनच आमदार राम सातपुतेंना निवडून आणण्याची जबाबदारी जशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवरत्नवर सोपविली होती तशीच जबाबदारी शरद पवारांकडून जानकरांना निवडून आणण्यासाठी सोपविण्यात येणार आहे. मात्र वसंतदादा गटाच्या ३० आमदारांचे नेतृत्व ज्या विजयदादांकडे होते त्यांना आज माळशिरस तालुक्यातील आमदार ठरविण्याचा अधिकार नाही याचे शिवरत्नने आत्मपरीक्षण करावे.
राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे खरे आहे. परंतु विठ्ठल परिवाराचे अभिजीत पाटील भाजपाला पाठिंबा देतात आणि त्यांचा प्रतिस्पर्धी भगीरथ भालकेंचा घाई गडबडीत शिवरत्न पाठिंबा घेतो. मात्र ५८ गावातील तळागाळातील जनतेत हा संदेश पोहचला का हा अभ्यासाचा विषय आहे. विठ्ठल परिवारातील दुसऱ्या फळीतील नेते युवराज पाटील आणि गणेश पाटलांना ताकद देऊन ५८ गावे पिंजून काढली असती तरी थोडाफार फरक पडला असता. मात्र धैर्यशील हे सुमार बुध्दीमत्तेच्या वर्तुळात अडकलेले आहेत. (आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो, बंडखोर परिवारातील राजकारणाचा गाढा अभ्यास असणाऱ्या सदस्यांशी खा. निंबाळकर आणि आमदार सातपुते बिझी शेड्यूलमधून फोन करून विचारविनिमय करायचे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि माणसांची पारख आहे.)
करमाळ्यात माजी आमदार नारायण पाटलांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून पवारांची तुतारी हाती घेतली खरी, पण नारायण पाटलांच्या ताब्यात करमाळा तालुक्यातील किती ग्रामपंचायती आहेत? माढा तालुक्यातील संजय कोकाटे यांच्या ताब्यात किती ग्रामपंचायती आहेत? शेकापच्या बाबाराजे देशमुखांचा गणपतराव देशमुखांएवढा जनमाणसात प्रभाव आहे का? घरचा उमेदवार म्हणून अकलूजकरांना धैर्यशील यांच्याबद्दल जसे अकलूजकरांना आपुलकी आणि प्रेम आहे तसेच आपल्या सातारा जिल्ह्यातील उमेदवार म्हणून होम ग्राउंड माण, खटाव, फलटणला खा. निंबाळकरांबद्दल आस्था आहे आणि राहणार ही नैसर्गिक बाब आहे. २०१९ मध्ये रामराजे खा. निंबाळकरांच्या विरोधात उघड उघड उतरले होते. परंतु खा. निंबाळकरांनी फलटणचा पाणीप्रश्न सोडविला, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यावेळी सभेला पन्नास हजाराहून जास्त फलटणकर होते याचा अभ्यास शिवरत्नने केलाच नाही. भाजपावर टोकाला जाऊन टिका करणाऱ्या शिवरत्नने आणखी एक अभ्यास करायला हवा होता, “पंतप्रधान मोदींना गरज भासली तर आदरणीय पवारसाहेब केव्हाही भाजपाबरोबर जाण्याची शक्यता आहे. कारण स्वत:च्या मुलीचे राजकीय करीअर स्ट्रॉंग करण्यासाठी ते अजितदादांना शह देण्याचा प्रयत्न करतील. कारण अजितदादांचा सुफडासाफ होण्याची दाट शक्यता आहे. राजकारणात कट्टर प्रतिस्पर्धी हे खूप जवळचे मित्र असतात. बंडखोर परिवाराच्या मते धैर्यशीलच्या ठिकाणी शिवबाबा उमेदवार असते, तर स्वच्छ प्रतिमेचा फायदा शिवरत्नला निश्चित झाला असता.