वेळापूरच्या कटाप्पाने माढ्याच्या बाहुबलीचा घात का केला?
माढा(बंडखोर वृत्तसेवा): रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार झाल्याबरोबर बारामतीकरांनी पळवलेले उजनी कालव्याचे पाणी स्वतः जाऊन बंद केले. माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळताच केवळ हायमास्ट दिवा आणि पिकअप शेड उभारून चमकोगिरी न करता त्यांनी कृष्णा-भीमा फ्लड डायव्हर्शन, निरा देवधर, टेंभू म्हैसाळ आदींसह विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडविला. त्याचबरोबर पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गालाही मंजुरी आणली. अशाप्रकारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे बाहुबलीप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघाचा विकास करीत असताना वेळापूरच्या संधीसाधू उत्तमराव जानकर या कटाप्पाने बाहुबलीचा घात का केला? असा प्रश्न राजकीय जाणकारांतून उपस्थित केला जात आहे.
मोहिते पाटील विरोधकाची झूल पांघरून मांडवलीचे राजकारण करणाऱ्या जातचोर उत्तमराव जानकर यांना सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधकांनी मोलाची मदत केली. त्या मदतीच्या जोरावर जानकरांनी गरुड बंगला बांधला. मात्र मांडवलीचे राजकारण करणाऱ्या उत्तमराव जानकरांनी वेळापूरातील बंगल्याला गरुड नाव दिले असले तरी त्यांचे कर्तृत्व गरुड भरारीसारखे नसून रंग बदलणाऱ्या फरुडासारखेच दिसून येत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे कुणाच्याही दबावाला बळी न पडणारे नेतृत्व असल्याने त्यांनी आपल्याला खासदार करण्यासाठी जे कोणी झटले त्यांच्यासाठी भरभरून मदत केली. उत्तमराव जानकर हे मोहिते पाटील विरोधक असल्याने त्यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मदत करीत असल्याबद्दल खासदार व मोहिते पाटलांमध्ये दरी निर्माण झाली. खा. निंबाळकर व मोहिते पाटलांमध्ये तेढ निर्माण होण्याचे एकमेव कारण उत्तमराव जानकर हेच आहेत. तरीही ऐनवेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना साथ देण्याऐवजी जानकरांनी मोहिते पाटलांसमोर आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी लोटांगण घेतल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहता धनगर समाज हा मोहिते पाटलांचा पारंपरिक विरोधक आहे. आजही ऍड. सुभाष पाटील यांच्या प्रखर मोहिते पाटलांच्या विरोधाबद्दल जनमानसांत आदर आहे. त्यांच्यानंतर सर्वजण उत्तमराव जानकरांना मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक समजत होते. मात्र जातचोर उत्तमराव जानकर यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी व भविष्यातील आमदारकी डोळ्यासमोर ठेवून मोहिते पाटील विरोधकांचा गट त्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला असला तरी जनतेने या कटाप्पाला आता चांगलेच ओळखले आहे. आता या कटाप्पाचे मनसुबे उधळून लावण्यासाठी व विषारी झाडाला जाळून टाकण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासारख्या बाहुलीसारखी गरज आहे असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.