शिवरत्नवर ना. गिरीश महाजन यांच्या हाताचा चावा घेणारा ‘तो’ कार्यकता कोण?
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): शिवरत्नवर नुकत्याच झालेल्या बैठकीत ना. गिरीश महाजन यांनी दिलेल्या भेटीत ते गर्दीतून वाट काढत शिवरत्न बंगल्यात जाताना महाजन यांच्या हाताचा एका कार्यकर्त्याने चक्क चावाच घेतल्याची दुर्दैवी माणुसकीला काळीमा फासणारी आणि अकलूजकरांना शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना घडल्याचे समजतेय. सदरचा कार्यकर्ता हा धैर्यशील यांचा निकटवर्तीय असल्याचे समजते.
चावणे आणि चाटणे हा श्वानांचा गुणधर्म आहे. धैर्यशीलने अशा माजलेल्या, पिसाळलेल्या श्वानप्रवृत्तींचा पट्टा स्वतःच्या हातात व्यवस्थित ठेवावा. खासदारांच्या गाडीपुढे गाजर फेकणे, रणजीतसिंह शिंदे यांचे उद्घाटनाचे कार्यक्रम उधळणे, ना. महाजन यांच्या हाताचा चावा घेणे आणि खासदार निंबाळकरांवर शाईफेकीचे नियोजन करणे या घटना अशोभनीय आहेत. थोरल्या दादांनी धैर्यशील मोहिते पाटलांना योग्य ती समज द्यावी. धैर्यशील यांचा राजकीय प्रवास भारतीय संसदेच्या दिशेने असावा, मुंबई सेंट्रल जेलच्या दिशेने नसावा असे त्यांच्या हितचिंतकांतून बोलले जात आहे.