भारत सरकारच्या नोटरीपदी ॲड. सुमित सावंत यांची नियुक्ती
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): केंद्रीय विधी व न्याय विभाग, भारत सरकार यांचे वतीने महाराष्ट्र राज्याकरिता नोटरी अधिकारी यांची नियुक्ती यादी दिनांक 15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाली असून यामध्ये माळशिरस येथील ॲड. सुमित सावंत यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व मित्र परिवार व हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
ॲड. सुमित सावंत हे माळशिरस न्यायालयात गेल्या दहा वर्षापासून वकिली व्यवसाय करीत असून ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. त्यांनी अनेक क्रिटिकल केसेस जिंकून पक्षकारांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीबाबत समजताच सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून ॲड. सुमित सावंत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.