मारकडवाडी ॲट्रोसिटी प्रकरणात उत्तम जानकर कुठल्या बिळात लपून बसले होते?
मोहिते पाटलांची हुकूमशाही मोडीत काढणाऱ्या राम सातपुते यांच्याबद्दल लाचार उत्तम जानकरांची मारझोडीची भाषा, समोरच्यांनी बांगड्या भरल्यात का?
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): सदाशिवनगर येथील गाव गाड्याची देवीच्या मंदिरावरून दादा खुडे व हरी पालवे यांच्यात वाद झाल्याने हरी पालवे यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल झालेली आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया असल्याने याबद्दल न्यायदेवता योग्य तो निर्णय घेईलच. मात्र या प्रकरणावरून मोहिते पाटलांचे लाचार आमदार उत्तम जानकर यांनी माजी आमदार राम सातपुते यांना टार्गेट करून ‘अंगावर कपडेच नव्हे तर चामडं सुद्धा ठेवणार नाही’ असे आक्षेपार्ह वक्तव्य करून मारझोडीची भाषा केलेली आहे. त्यामुळे जानकरांना सातपुते समर्थकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले असून समोरच्यांनी काय बांगड्या भरल्यात का? असा सूर त्यांच्यातून निघत आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी मारकडवाडी येथील मातंग समाजातील कार्यकर्त्यांनीही ॲट्रोसिटी दाखल केली होती. तेव्हा त्यांची बाजू न घेता उत्तम जानकरांनी तिथल्या जातीयवाद्यांना वाचवायची भूमिका का घेतली होती? पीडितांच्या पाठीशी उभे न राहता जानकर कुठल्या बिळात लपून बसले होते? असा प्रश्न एससी समाजातून उपस्थित केला जात आहे.
जातचोर उत्तमराव जानकरांनी खोट्या एससीच्या दाखल्यावर जयसिंह मोहिते पाटलांचे बुटासकट पाय धरुन माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळवली आहे. त्यामुळे पारंपरिक मोहिते पाटील विरोधकांसह स्वाभिमानी लोकांनी राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करून राम सातपुते यांच्या नेतृत्वाला स्वीकारले आहे. त्यामुळे उत्तम जानकरांच्या बुडाला चांगलीच आग लागली आहे. म्हणूनच ते सैरभैर झाले असून मुद्द्यावरुन ते आता गुद्द्यावर आले आहेत. वास्तविक पाहता गुंडगिरी आणि ब्लॅकमेलिंग ही त्यांच्या पाचवीलाच पूजलेली आहे. भर रस्त्यात तहसीलदार यांना अडवून जबर मारहाण करणाऱ्या उत्तम जानकरांकडून आणखी काय अपेक्षा असणार? सुमित्रा पतसंस्थेच्या विरोधात मोर्चा काढतो म्हणून उत्तम जानकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना पत्रके वाटायला लावली. आणि ऐनवेळी तो मोर्चा रद्द करून ते दोन कोटीत जयसिंह मोहिते पाटील यांना मॅनेज झाले होते. मोहिते पाटलांना शिव्या हेच जानकरांचे राजकीय भांडवल होते. त्यांना शिव्या देऊनच संजयमामा शिंदे व प्रशांत परिचारक यांचेकडून उत्तम जानकरांनी शिधा गोळा केला होता. शेतकरी साखर कारखाना सुरू करण्यासाठी जानकरांनी या दोघांची चांगलीच मदत घेतली. पण हळूहळू कारखाना बंद पडत चालला आणि वेळापूरात त्यांची हवेली उभी राहिली. त्यामुळे आता संजयमामा शिंदे व प्रशांत परिचारक यांनी जानकरांना चांगलेच ओळखल्याने ते आता यांना आपल्या दारात उभेही करीत नाहीत. उत्तम जानकरांनी शेतकरी साखर कारखाना सुरू केल्यानंतर समाजासाठी आपलाही हातभार असावा या उद्देशाने उद्योगपती सावकार वाघमोडे त्यांच्या मदतीला आले. पण जानकरांच्या टेंशनने वाघमोडे यांना आपल्या जीवाला मुकावे लागले. त्यानंतर मोहिते पाटील विरोधकांचा कारखाना असावा या उद्देशाने सुरू केलेला हा कारखाना विकून ज्यांनी जमिनी दिल्या होत्या, पैसा पुरवला होता अशांना जानकरांनी देशोधडीला लावण्याचे काम केले. मग राम सातपुते यांच्यासारखा खमक्या विरोधक मोहिते पाटील विरोधकांना भेटल्यावर ते जानकरांना फाट्यावर मारून सातपुते यांच्या गोटात जाणारच ना! पण आता मोहिते पाटलांच्या वळचणीला गेलेले उत्तम जानकर स्व. हनुमंतराव डोळस यांचा वारसा चालवत असल्याचे दिसून येत आहे. मोहिते पाटलांनी विरोधकांच्या अंगावर सोडण्यासाठी डोळस यांचा वापर केला होता. मात्र जानकर हे मोहिते पाटलांनी आदेश देण्यापूर्वीच त्यांचे कट्टर विरोधक राम सातपुते यांच्यावर तुटून पडत आहेत. कारण मोहिते पाटलांच्या डोकेदुखीला ते आता आपली डोकेदुखी समजत आहेत. भारतीय संविधानानुसार देशातील कुठल्याही नागरिकाला कुठेही राहण्याचा, कुठूनही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. तरीही रामभाऊ सातपुते यांच्याबद्दल बीडचे म्हणून सारखे तुणतुणे वाजवले जातंय. तसेच राम सातपुते हे बीडची संस्कृती इथे रुजवू पहात आहेत असा जानकरांसह सातपुते विरोधकांतून दिंडोरा पिटला जात आहे. परंतु उत्तम जानकर यांच्यासारखे त्यांनी कधी खालच्या पातळीवर जाऊन गुंडगिरी, दादागिरी केली नाही. जानकरांचं खरं दुखणं हे आहे की, राम सातपुते हे प्रखर मोहिते पाटील विरोधक आहेत. त्यांनी मोहिते पाटलांची हुकूमशाही, एकाधिकारशाही, मक्तेदारी मोडीत काढून उत्तम जानकर यांचेही पाणी कमी केले आहे. राम सातपुते यांच्या रुपाने स्वाभिमानी मोहिते पाटील विरोधकांना राम सातपुते यांच्यासारखा प्रामाणिकपणे लढणारा आक्रमक चेहरा मिळाल्याने जानकरांच्या मागचा जनाधार हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्यामुळे उसने अवसान आणून उत्तम जानकर आपला पूर्वीचा आक्रमकपणा दाखविण्याचा कितीही केविलवाणा प्रयत्न करीत असले तरी त्यांची अवस्था दात, नखे व आयाळ काढलेल्या सिंहासारखी झाली आहे. दरम्यान ॲट्रोसिटीचे भांडवल करून ते मुद्द्यावरुन गुद्द्याची भाषा वापरु लागले असले तरी मारकडवाडी ॲट्रोसिटी प्रकरणात त्यांनी जातीयवादी आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न केल्याचे पाहून उत्तम जानकर चांगलेच तोंडघशी पडलेले दिसत आहेत.