Back To Top

डॉ. निलेश सुरेश ननवरे याने हिंदुत्ववादी चळवळीचा वापर श्रीमंत होण्यासाठी केला, भाजपा कार्यकर्त्यांतून चर्चा!

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): गरिबांसाठी लढता लढता श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणजे राजकारण अशी राजकारणाची दुसरी व्याख्या आता काही जणांना लागू होत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अकलूजच्या रामायण चौक येथील डॉ. निलेश सुरेश ननवरे असा सूर अकलूज परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांतून उमटत आहे.

याबाबत त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून आम्हाला मिळालेली माहिती अशी की, डॉ. निलेश रणवरे हे आरएसएस आणि भाजपामध्ये सक्रिय आहेत. संघटन करण्यासाठी कार्यक्रमासाठी जो निधी येतो तो निधी स्वहितासाठी स्व उन्नतीसाठी आणि श्रीमंत होण्यासाठी वापरून स्वत: गब्बर झालेला गब्बर सिंग म्हणजे डॉ. निलेश ननवरे…! जवळजवळ 80 तोळे सोने आणि पाच गुंठे प्लॉट खरेदी ही आम्हाला त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांकडून मिळालेली माहिती आहे. फारशी उत्पन्नाची साधने नसताना आणि पैसे मिळविण्याची अन्य साधने नसताना त्यांनी हा पैसा नेमका कुठून आणला? हा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडल्याशिवाय राहत नाही.

भाजपामध्ये प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना सुद्धा तेवढीच किंमत आणि आदर आहे. ज्यावेळी रणजीतसिंह मोहिते पाटील, धर्यशील मोहिते पाटील यांचा भाजपा प्रवेश होणार होता त्यावेळी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, तुम्ही भाजपमध्ये येत असाल तर तुम्ही अकलूजमधील सचिन शिंदे यांना घेऊन आमच्याकडे या मग आम्ही निर्णय घेऊ. सचिन शिंदे हे कुठे राहतात, काय करतात? हे मोहिते पाटील यांना माहित नव्हतं. मात्र सचिन शिंदे यांना मोहिते पाटील भेटले. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सचिन शिंदे यांना घेऊन गेले आणि नंतरच भाजप प्रवेश नक्की झाला. भाजपमधली ही दोन दृश्ये आहेत. एक प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्याचे, तर दुसरे उदाहरण डॉ. निलेश ननवरे यांचं…! जे चळवळीचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी आणि श्रीमंत होण्यासाठी करतात भाजप-श्रेष्ठी याचा गांभीर्याने विचार करतील का? अशी आता जनतेतून विचारणा होत आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचे इतके स्तोत्र नसताना कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणारे निलेश ननवरे हे नेमकं कोणतं सामाजिक काम करत आहेत हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे अशी भाजपा कार्यकर्त्यांसाह सर्वसामान्य जनतेतून चर्चा होताना दिसत आहे.

Prev Post

Next Post

अदृश्य शक्तीचा नव्हता कहर; हा तर होता ‘वसंता’चा बहर!

post-bars

Leave a Comment