डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचे दीपप्रज्वलन करून अकलूजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन!
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकलूजमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सायंकाळी समस्त बौद्ध समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर ज्या सहीने देशाचे भवितव्य घडले त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीवर मेणबत्त्या लावून दीपप्रज्वलन केले.

परिवर्तन प्रतिष्ठानचे नाशिक (आबा) सोनवणे व भीमसैनिक ग्रुपचे संदीप (आण्णा) गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी १००० मेणबत्त्या प्रज्वलित करून त्रिसरण, पंचशील, भीमवंदना घेण्यात आली. तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९:०० वाजता त्रिसरण, पंचशील, भीमस्मरण, भीमस्तुती घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी समस्त बौद्ध समाजासह सर्व जाती धर्मातील मान्यवर व भीम अनुयायी उपस्थित होते.