एससी समाजाच्या बोकांडी बसलेल्या जातचोर जीवन जानकरचे डिपॉझिट जप्त झालेच पाहिजे!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): प्रस्थापित मोहिते पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे लढणारा चेहरा म्हणून उत्तम जानकर आमदार व्हावेत अशी स्वाभिमानी मोहिते पाटील विरोधकांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार उत्तम जानकर आमदार झाले, परंतु त्यांनी स्वतःला शिवरत्नच्या दावणीला बांधून मोहिते पाटलांचे दास म्हणून राहण्यातच धन्यता मानली. त्याचबरोबर मोहिते पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवत तालुक्यातील राजकारणात त्यांनी आपली घराणेशाही सुरू केली. यामुळे लोक त्यांना स्वीकारतील की ठोकरतील हे कळेलच. मात्र एससी समाजासाठी राखीव असलेल्या दहिगाव जिल्हा परिषद गटातून जानकरांनी त्यांचे दिवटे जीवन जानकरला उमेदवारी देऊन त्याला एससी समाजाच्या बोकांडी बसविल्याने जातचोर जानकरांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी एससी समाजाने जीवन जानकरचे डिपॉझिट जप्त करावे अशा संतप्त प्रतिक्रिया माळशिरस तालुक्यातील एससी समाजातून निघत आहेत.
पूर्वी माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांची सुरू असलेली दहशत, मक्तेदारी, दंडेलशाही मोडीत काढण्यासाठी माळशिरस तालुक्याला आमदार म्हणून उत्तम जानकर यांच्यासारखा आक्रमक, लढवय्या चेहरा असावा असे दबलेल्या, पिचलेल्या वर्गासह तालुक्यातील स्वाभिमानी मोहिते पाटील विरोधकांना वाटत होते. या हेतूनेच एससी समाजातील काही कार्यकर्त्यांनी जानकरांच्या बोगस एससीच्या दाखल्याला मदत केली होती. त्यावेळी मी हा दाखला केवळ आमदारकीसाठीच वापरेन, इतर कुठेही वापरणार नाही असे उत्तम जानकर म्हणाले होते. मात्र काही लोक वेळ निभावेपर्यंत फक्त थापाच मारत असतात हे उत्तम जानकरांची एससी समाजात सुरु असलेली घुसखोरी पाहून समजते. दहिगाव जिल्हा परिषद गट हा एससी समाजासाठी राखीव आहे. या ठिकाणाहून ओरिजनल एससी समाजाला उमेदवारी देण्याऐवजी त्याठिकाणी जातचोर जीवन जानकरला एससी समाजाच्या बोकांडी बसवले आहे. याबद्दल कुणी बोलले तर बीडवरुन आलेल्या राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांना लोकांनी स्वीकारले तर चालेल का? असा बालिश प्रश्न अर्धवटराव उपस्थित करीत आहेत. पण अरे चोंग्यांनो, संस्कृती सातपुते या ओरिजनल एससी आहेत, उत्तम जानकर यांच्यासारख्या बोगस जातीच्या दाखल्याआधारे त्या एससी समाजात घुसलेल्या नाहीत. वास्तविक पाहता उत्तम जानकर हे माळशिरस तालुक्याचे आमदार आहेत. तालुक्यातील विविध प्रश्न ते सोडवू शकतात. मग आपल्या मुलाला बोगस दाखल्याच्या आधारे जिल्हा परिषद सदस्य करण्याची त्यांना घाई का झाली आहे? त्याठिकाणी उमेदवारी देण्यासाठी त्यांच्यासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता त्यांना दिसला नाही का? की आपल्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर जानकर पिता पुत्रांच्या पालख्याच वहायच्या? हा त्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आपापसातील मुद्दा असल्याने त्यांचे ते बघून घेतील. परंतु जानकरांच्या बोगस दाखल्यामुळे एसी समाजाच्या हक्काच्या जागेवर गंडांतर येत आहे. त्यामुळे एससी समाजातून जातचोर जानकर पिता पुत्रांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उत्तम जानकर स्वतः आमदार, त्यांची पत्नी वेळापूर पंचायत समिती गणातून तर मुलगा दहिगाव जिल्हा परिषद गटातून मैदानात आहेत. आजपर्यंत मोहिते पाटलांनी सुद्धा इतकं अति केलं नव्हतं तितका सत्तेचा नंगानाच उत्तम जानकरांनी सुरू केला आहे. ओपन असो की राखीव असो त्याठिकाणी आपल्याच घरातील सदस्यांनी निवडणूक लढवायची या हेतूनेच उत्तम जानकरांनी एससी समाजाचा बोगस जातीचा दाखला काढला आहे. पैशांच्या जोरावर आणि सत्ताधाऱ्यांची दिशाभूल करुन त्यांच्या संगनमताने उत्तम जानकरांनी मुंबई उच्च न्यायालयातून एससी समाजाचा बोगस जातीचा दाखला आणला असला तरी अशा धूर्त, संधीसाधू, लबाड जानकरांना धडा शिकवण्यासाठी दहिगाव जिल्हा परिषद गटात एससी समाजासह स्वाभिमानी मोहिते पाटील विरोधकांनी त्यांचे दिवटे जीवन जानकरचे डिपॉझिट जप्त केलेच पाहिजे. तरच मोहिते पाटलांचे दास झालेल्या उत्तम जानकरांच्या संधीसाधू राजकारणाला लगाम बसेल.