Warning: include_once(/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php): Failed to open stream: Permission denied in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508

Warning: include_once(): Failed opening '/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php84/usr/share/pear:/opt/alt/php84/usr/share/php:/usr/share/pear:/usr/share/php') in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508
मोहिते पाटलांची वतनदारी मानसिकता गुलामीकडे नेणारी! – Bandkhor News

LOADING...

 मोहिते पाटलांची वतनदारी मानसिकता गुलामीकडे नेणारी!

मोहिते पाटलांची वतनदारी मानसिकता गुलामीकडे नेणारी!

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९(१)(ड) आणि १९(१)(ई) नुसार नागरिकांना देशात मुक्तपणे संचार करण्याचा आणि कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार आहे. त्यासाठी कुठल्या स्थानिक राजकीय घराण्याची परवानगी लागत नाही. मात्र एखादा परजिल्ह्यातून येतो आणि आपले अस्तित्वच मिटविण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे स्थानिक राजकारणी बाहेरून आलेल्या व्यक्तीला जगतकरी म्हणून हिणवतात. राम सातपुते यांनी २०१९ साली माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यापासून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मोहिते पाटील घराण्याची मक्तेदारी असलेल्या माळशिरस तालुक्यात धुरंधर कामं करून दांडगा जनसंपर्क वाढवत थेट मोहिते पाटील घराण्यालाच आव्हान दिल्याने निरा नदीच्या पाण्यासाठी केलेल्या आंदोलनात खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांचा जगतकरी असा उल्लेख केला. पण या पृथ्वीतलावर आलेले सगळेच जगतकरी आहेत. तुम्ही सुध्दा मूळचे म्हसवडचेच! मग आपणास इतरांना हिणवण्याचा काय नैतिक अधिकार आहे? एकंदरीत वतनदारी आणि जगतकरी हे आपले शब्द पाहून आपली मानसिकताच लोकांना गुलामीकडे घेऊन जाणारी आहे अशा प्रतिक्रिया स्वाभिमानी नेते व कार्यकर्त्यांतून उमटत आहेत.

बीडचा माणूस सोलापूरात राहू शकतो. सोलापूरचा माणूस पुण्यात राहू शकतो. पुण्याचा माणूस मुंबईत स्थायिक होऊ शकतो. माळशिरसचा तुमच्यासारखा माणूस पंढरपूर-मंगळवेढ्यात जाऊन राजकारण करू शकतो. मग दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन एखादा नेता माळशिरस तालुक्यात परिवर्तन करीत असेल तर तुम्हाला इतके वावडे का असावे? भारतात लोकशाही असताना अजूनही आपल्यासारख्या काही राजकीय घराण्यांची वतनदारी सुरू आहे का? हा प्रश्न आता संविधानप्रेमींनी, देशप्रेमींनी विचारण्याची गरज आहे. राजकीय विरोधकांच्या कामगिरीवर मुद्द्यांच्या आधारे टीका करण्याऐवजी त्यांच्या गावावरून जर आपण हिणवत असाल तर खा. धैर्यशील मोहिते पाटील, आजही तुमचे विचार बुरसटलेलेच आहेत. बुरसटलेले विचार लोकशाहीसाठी घातक असतात. त्यांच्याकडून परिवर्तनाची अपेक्षा करणे म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात राहण्यासारखेच आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून २००९ साली शरद पवार लढले तेव्हा त्यांचा तुम्ही जगतकरी असा उल्लेख करण्याचे धाडस का दाखवले नाही? बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण हयात नसलेल्या आणि ज्येष्ठ नेत्यांबद्दल न बोलणे हेच शहाणपणाचे ठरेल. वास्तविक पाहता सर्वांनी आपल्या पालखीचे भोई व्हावे असेच आपणास वाटत असावे. पण भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून रूढी, परंपरा, राजेशाही मोडीत काढून गणराज्य स्थापित केलंय याचे सरंजामशाहींनी भान ठेवले पाहिजे. भलेही सहकाराच्या माध्यमातून मोहिते पाटलांनी दीर्घकाळ माळशिरस तालुक्यावर प्रभुत्व गाजवले. परंतु राजकीय प्रभुत्व म्हणजे आपला तालुक्यावर, गावावर मालकी हक्क नव्हे! एकंदरीत आपण सहकाराच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यात गुलामांची फौज निर्माण केलीय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण त्यांच्या संस्थेत काम करीत असलेले लोक व त्यांचे नातलग सुध्दा खुल्यापणाने गावात वावरू शकत नाहीत. मोहिते पाटलांच्या विरोधात सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांपासून त्यांना चार हात लांबच थांबावे लागते. कारण कुणीतरी आपला फोटो काढून त्यांना पाठवेल ही त्यांना भीती असते. मोहिते पाटलांची हीच दहशत भाजपाने पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व राम सातपुते यांच्या माध्यमातून मोडीत काढण्याचे काम केले आहे. म्हणूनच जिथे तिथे जयकुमार गोरे व राम सातपुते मोहिते पाटलांना दिसत आहेत. वास्तविक पाहता राम सातपुते असोत किंवा दुसरा कोणताही नेता, त्यांच्या राजकारणाचे मूल्यमापन त्यांच्या कामगिरीवर झाले पाहिजे. त्यासाठी कुळ आणि मूळ शोधण्याची आवश्यकता नाही. असले उद्योग बुरसटलेल्या विचारांचेच लोक करू शकतात. पूर्वीच्या काळात वतनदार, जहागीरदार आणि सरंजामदार यांची सत्ता होती. तीच परंपरा खा. धैर्यशील मोहिते पाटील यांना लागू करायची आहे का? छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी महाराष्ट्राला समता, सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठेची दिशा दिली. या महाराष्ट्रात एखाद्या व्यक्तीची किंमत त्याच्या जन्मावरून ठरविण्याची मानसिकता म्हणजे महामानवांनी दाखविलेल्या दिशेच्या विरूध्दच जाणे आहे. भलेही मोहिते पाटील राम सातपुते यांना जन्मावरून नव्हे, तर त्यांच्या मूळ गावावरून हिणवत असतील. पण राम सातपुते यांना जगतकरी, पार्सल म्हणून हिणवणे हे खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे संविधानिक अधिकारांवर घाला घालणारे आहे असेच म्हणावे लागेल.

Prev Post

प्रस्थापितांच्या सत्तेला आव्हान देत माणच्या…

post-bars

Leave a Comment