मोक्का केस कलम ३०२ मधील मुख्य आरोपीमधील तुषार राजेंद्र काटे याला मुंबई उच्च न्यायालय येथून जामीन
मुख्य आरोपीचाही लवकरच जामीन मंजूर करण्याचे प्रयत्न चालू – ॲड. संदीप मगर
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): अक्षय चंदनशिवे खूनप्रकरणी गेल्या सहा वर्षांपासून मोक्काअंतर्गत कलम ३०२ प्रमाणे अटकेत असलेल्या सात आरोपींपैकी तुषार राजेंद्र काटे या आरोपीस मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे. याबाबत ॲड. संदीप दत्तात्रय मगर यांनी विशेष प्रयत्न केले. सदर प्रकरणातील हा अनुक्रमे ६ वा जामीन अर्ज ॲड. संदीप मगर यांनी मंजूर करून आणला आहे. याआधी यातील सिद्धांत ताकतोडे व सोमनाथ रूपनवर याचा जामीन सर्वोच्च न्यायालयातून करून आणला होता. त्यानंतर गेल्याच महिन्यात आरोपी नितीन उर्फ पप्पू बाळू पवार याचा उच्च न्यायालय मुंबई येथून जामीन मंजूर करून आणला आहे. तसेच नितीन उर्फ पप्पू बाळू पवार आणि रहिमत उर्फ सुलतान दिलावर बागवान यांचा देखील जामीन जिल्हा व सत्र न्यायालयातून ॲड. संदीप मगर यांनी मंजूर करून घेतला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, १४ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ४:०० च्या सुमारास अक्षय चंदनशिवे याच्यावर खूनीहल्ला झाल्यानंतर रात्री डॉ. एम. के. इनामदार यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. तेव्हा फिर्यादी आदर्श दीपक गायकवाड याच्या तक्रारीवरून सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या आकाश उर्फ आण्णा राजेंद्र कोळेकर, तुषार राजेंद्र काटे, सोमनाथ बिरुदेव रुपनवर, विकास महादेव शिंदे, नितीन उर्फ पप्पू बाळू पवार, सिध्दांत नानासाहेब ताकतोडे, रहिमान उर्फ सुलतान दिलावर बागवान यांच्यावर भादंवि कलम ३०२, ३२४, ३४१, ३२३, ५०४, ५०६, १४७, १४८, १४९, ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये ३ (२), ३ (२ va) गुन्हा दाखल झाला होता. हद्दपार असताना या आरोपींवर कलम ३०२ अंतर्गत विविध गुन्हे दाखल झाल्याने त्यांना मोक्का लागला होता. तेव्हापासून ते येरवडा कारागृहात आहेत. यादरम्यान त्यांनी जामिनासाठी वारंवार प्रयत्न करुनही त्यांचे जामीन फेटाळले जात होते. तेव्हा ॲड. संदीप दत्तात्रय मगर यांनी जामिनासाठी विशेष प्रयत्न करुन सातपैकी सोमनाथ बिरुदेव रूपनवर या आरोपीला सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणामध्ये प्रथम सिद्धांत ताकतोडे याचा जामीन सर्वोच्च न्यायालयातून करून आणला आहे. यानंतर २४/०९/२०२५ रोजी यातील आरोपी नितीन पवार याचा उच्च न्यायालयात जमीन मंजूर करण्यात आला. त्यात ॲड. संदीप मगर यांनी मुख्यतः युक्तिवाद केला. तसेच दिनांक १७/१०/२०२५ रोजी आरोपी विकास महेश शिंदे व रहिमत दिलावर बागवान यांच्या बाजूने सविस्तर व उत्तमरित्या युक्तिवाद करून ॲड. संदीप मगर यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर करून घेतला होता. दिनांक २८/०१/२०२६ रोजी आरोपी क्र. २ तुषार राजेंद्र काटे याचा जामीन मंजूर करून घेतला आहे.