Back To Top

October 3, 2023

उत्तर अमेरिकेत उभारला डॉ. आंबेडकरांचा सर्वांत उंच पुतळा

वॉशिंग्टन: आगामी 14 ऑक्टोबर रोजी उत्तर अमेरिकेच्या मेरीलॅण्ड येथे भारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ नावाचा 19 फुटांचा पुतळा, वॉशिंग्टनच्या दक्षिणेस अंदाजे 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेरीलॅण्डच्या अकोकीक शहरात 13 एकर जमिनीवर बांधण्यात आलेल्या आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचा (एआयसी) भाग आहे. हा भारताबाहेरील डॉ. आंबेडकर यांचा सर्वांत मोठा पुतळा आहे आणि या केंद्रात बांधण्यात येत असलेल्या आंबेडकर स्मारकाचा एक भाग म्हणून स्थापित करण्यात आला आहे, असे एआयसीने सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. त्याच वर्षी 14 ऑक्टोबर रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. 14 ऑक्टोबर हा ‘धम्मचक्र प्रवर्तनदिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच तारखेला मेरीलॅण्डमधील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा पुतळा प्रख्यात कलाकार व शिल्पकार राम सुतार यांनी घडवला आहे. राम सुतार यांनी सरदार पटेल यांचा पुतळासुद्धा उभारला असून, या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणतात. हा पुतळा गुजरातमधील सरदार सरोवर धरणाच्या खाली असलेल्या नर्मदा बेटावर स्थापित केला आहे. अमेरिका व जगाच्या इतर भागातून आंबेडकरी चळवळीचे प्रतिनिधी व त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, असे त्यात म्हटले आहे.

Prev Post

मोहिते पाटलांनी विरोधकांना बोलू न देता अकलूज बाजार समितीची वार्षिक…

Next Post

लोकशाही मार्गाने अकलूज मार्केट कमिटीत उत्तमराव जानकर बोलणारच – पांडुरंग…

post-bars

Leave a Comment